संगणक प्रणालीच्या माध्यमातून श्रीगणेश प्रतिष्ठापना पूजा
| वर्षानुवर्षे भक्तिभावाने केल्या जाणार्या श्रीगणेश प्रतिष्ठापना पूजेला संगणकीय तंत्रज्ञानाची जोड देऊन एका नव्या साधनाची निर्मिती करणयात आली आहे. हे साधन ज्ञान प्रबोधिनीची संस्कृत संस्कृति संशोधिका आणि ऍटक्लिक्स टेक्नॉलॉजीस् पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नाने दृक्-श्राव्य माध्यमात उपलब्ध करून देण्यात येत आहे.
भ्रमणभाष आणि आंतरजालीय सुविधेच्या (चेलळश्रश रपव खपींशीपशीं) माध्यमातून ही पूजा सर्वांसाठी या वर्षीच्या गणेशोत्सवात विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहे. अपवीेळव आणि थळपवेुी या संगणक प्रणालींवर ती उपलब्ध आहे.
एकूण ७० मि.च्या या पूजेमध्ये गणेश प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक सूचना, साहित्याची तयारी या विषयी मार्गदर्शन प्रारंभी केले आहे. ज्ञानप्रबोधिनीने प्रकाशित केलेली वैशिष्ट्यपूर्ण पोथी संगणकावर,भ्रमणभाषवर किंवा ढरलश्रशीं,झ.उ. इ. अन्य संबंधित उपकरणांवर ऊेुपश्रेरव करता येते. या पूजेतील विविध कृतींच्या सूचना, आशय, मंत्रोधारण आणि मंत्रांचा अर्थ अशा स्वरूपाची मांडणी यात केली आहे. संपूर्ण पोथी उपकरणावर ऐकण्याची व पाहण्याची सोय उपलब्ध आहे. सारांश, प्रत्यक्ष पुरोहितांच्या उपस्थितीशिवायही हे माध्यम पाहून -ऐकून गणेशाची प्रतिष्ठापना करणे शक्य आहे.
कोणताही धार्मिक आचार करीत असताना तो समजून-उमजून करावा, त्यामधील आशय समाजावून घ्यावा, पूजेमध्ये सर्वांचा सहभाग असावा, पूजेचे मंत्र सर्वांनी म्हणावेत आणि उत्साहाने पण शांतपणाने संस्कार पूर्ण व्हावा अशी ज्ञान प्रबोधिनीची भूमिका आहे आणि हाच भाव व्यक्त होईल अशी या साधनातील पूजेची मांडणी आहे.
ुुु.रींलश्रळु.लो, ुुु.शील-र्ीिपश.ेीस, ुुु.ीिरीहरश्रर.क्षपरपरीिरलेवहळपळ.ेीस या संकेत स्थळांवरून ही पूजा रविवार दि. १६ सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी संपर्क श्री राहुल भानोसे - ९८२३३६८३०३, श्री श्रीनिवास कुलकर्णी - ९८६००९१११३. |
Download |
| Download |